आपल्या देशाची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीये. दोन मुलांपेक्षा जास्त मुले असू नयेत, तीन मुलं असणा-यांचे सर्व सरकारी लाभ काढून घ्यावेत, तीन अपत्य असलेल्या पित्याचा मतदारानाचा अधिकार रद्द करावा, लोकसंख्या कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले यासंदर्भात सरकार कडून कागदपत्रं मागवावीत अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्यात.ॲड अनुज सक्सेना, ॲड प्रिया शर्मा, ॲड पृथ्वीराज चौहान यांनी ही याचिका केलीये. यावर पुढल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews